Surprise Me!

दिवाळीनंतर मंदिरं सुरू करण्याचे वडेट्टीवारांचे संकेत

2021-06-12 0 Dailymotion

चंद्रपूर- दिवाळी नंतर मंदिरे खुली करण्याचे संकेत राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंदिर उघडण्याला राज्य सरकारचा मुळीच विरोध नाही. पण त्यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. लोकल सुरू केल्यानंतर होणारी गर्दी आटोक्यात आणणं कठीण होत चाललं. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी तिला आमंत्रण देणं परवडणारं नाही. थोडी वाट बघावी लागेल. पण दिवाळीनंतर मंदिरं उघडण्याचा शासनाचा विचार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Buy Now on CodeCanyon