चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हीडिओवरून एनसीबीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हा व्हिडिओ २०१९ साली वायरल झाला, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही, असा सवाल काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.