Surprise Me!

सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे : देवेंद्र फडणवीस

2021-06-12 0 Dailymotion

राज्यात विशेषतः मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यात कुठेही पंचनामे सुरू असल्याचे दिसून येत नाहीत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 16 ऑक्‍टोबर) केला. <br />फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Buy Now on CodeCanyon