Vistadome Coach - आता मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास होणार सुखकारक

निसर्गा न्याहाळत करा व्हिस्टाडोममधून प्रवास

पुणे- मुंबई मार्गावर येत्या शनिवारपासून (ता. २६) डेक्कन एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यात आधुनिक सुविधा असलेला एक विस्टाडोम कोच असेल ज्यामुळे तुम्हाला हा प्रवास निसर्गरम्य वातावरणातुन करायचा एक विशेष अनुभव घेता येणार आहे.

काय आहे विस्टाडोम कोच?

- या गाडीचा शेवटचा डबा म्हणजे विस्टाडोम कोच असेल.

- या डब्याच्या खिडक्या मोठ्या काचेचे असून छतांमध्येही पारदर्शक काच लावण्यात आली आहे, जी 180 अंश फिरवला जाते.

- या डब्याच्या प्रवेशाजवळ ऑब्जर्वेशन लाउंज देखील बनविण्यात आले आहे, येथे उभे असताना आपण बाहेरील निसर्गाचे सुंदर दृश्य पाहू शकाल.

- वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे हा प्रवास अधिक मनोरंजक बनवतील.

-इतर डब्यांच्या तुलनेत अधिक भाडे असेल.डेक्कन एक्स्प्रेस (क्र. ०१००७) २६ जूनपासून सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता ही गाडी निघेल आणि सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. पुण्यावरून ही गाडी (क्र. ०१००८) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल आणि सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मुंबईला पोचेल.

#vistadome #coach #train #deccanexpress #pune #mumbai