Surprise Me!

International Level Stadium: कोल्हापुरात तयार झाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान

2021-07-02 7 Dailymotion

कोल्हापूर: दिवसरात्र खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी शास्त्रीनगर मैदान तयार असल्याचे मत येथील तांत्रिक कमिटी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कोरोनानंतर सुरू होणाऱ्या पुढील हंगामात प्रकाशझोतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी हे मैदान सज्ज आहे.<br />शास्त्रीनगर येथील अद्ययावत क्रिकेट मैदान नावारूपाला येत आहे. येथे ऑस्ट्रेलियन ग्राससह जागतिक दर्जाच्या ७ खेळपट्ट्या बनवल्या आहेत. प्रेक्षकांसाठी न्यूझीलँडसारखी बैठक व्यवस्था तर अत्याधुनिक ड्रेन सिस्टिम कार्यान्वित आहे. प्रकाश व्यवस्थेसाठी १०० फुटाचे चार मनोरे उभारले आहेत. त्यावर १९२ लाईटस बसवले आहेत. लाईटचे तिसरे आणि शेवटचे टेस्टिंग पूर्ण झाले. <br />व्हिडिओ : मोहन मेस्त्री<br />#Kolhapur #Stadium #CricketStadium #ShastrinagarStadiumKolhapur #Internationallevelstadium

Buy Now on CodeCanyon