MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलीये. स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. मला माहितेय माझं पोरगं किती झुरलंय ते. आई मुलाखत झाली नाही असं तो मला म्हणायचा. परीक्षा पास झालोय, पण मुलाखत अजून झाली नाही. दोन वर्ष तो खूप झुरला, असं आई म्हणाली.<br />#SwapnilLonkar #SwapnilLonkarSuicide #MPSC #SwapnilLonkarFamily #Swapnilmother #Swapnil