Surprise Me!

मोहम्मद युसूफ खान हे 'दिलीप कुमार' कसे झाले?

2021-07-07 1,235 Dailymotion

बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमावलं आहे. त्यांचे चित्रपट आणि अभिनय सगळ्यांच्या मनात घर करुन आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये ब्रिटिश भारतातील (आताचे पाकिस्तान) म्हणजेच पेशावरमध्ये झाला. त्यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. 65 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांचे नाव बदलण्यामागे एक रंजक गोष्ट आहे. कदाचित अनेकांना हा प्रश्नसुद्धा नक्कीच पडला असेल, मोहम्मद युसूफ खान हे 'दिलीप कुमार' कसे झाले? त्याच्यामागील कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.<br />सुस्मिता वडतिले<br /><br />#DilipKumar #DilipkumarDeath #DilipKumarDies #DilipKumarRealName #MohammadYusufKhan

Buy Now on CodeCanyon