Satara : साताऱ्यातला पहिलाच उपक्रम; 'माणदेशी'कडून महिलांना मोफत डोस

Satara (म्हसवड) : कोरोनाच्या साथीपासून महिलांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे, यासाठी श्रीमती चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून सहा हजार महिलांना मोफत कोव्हिड व्हॅक्सिनचे लसीकरण करण्याचा राबविलेला हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असून महिलांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. गोंदवले येथे कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. मात्र, सध्या कोव्हिडच्या लसीची टंचाई असल्यामुळे पुरेशा संख्येने शासनाकडे लस उपलब्ध होत नाही, या अडचणीच्या काळात माणदेशीने बेल-एअर हॉस्पिटलच्या सहकार्याने सहा हजार महिलांसाठी लस उपलब्ध करुन लसीकरणही सुरु केले आहे.

व्हिडिओ : सल्लाउद्दीन चोपदार

#VaccinationDrive #satara