Aurangabad : ३१ डिसेंबरपूर्वी ५ हजार पदे भरणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Aurangabad : येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्यभरात ५ हजार जागांची पोलिस भरती झालेली असेल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.१२) औरंगाबादेत दिली. शहर पोलिस दल तसेच औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पदभरतीनंतरही ७ हजार पोलिसांची पुन्हा नव्याने भरती करणार असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल काही गुन्हे मागे घेतलेले आहेत. आता उर्वरित गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

व्हीडीओ - सचिन माने

#dilipwalsepatil #aurangabad