Surprise Me!

Bigg boss ott - शिल्पा शेट्टीच्या बहिणीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

2021-08-10 429 Dailymotion

छोट्या पदद्यावरील कायम चर्चेत असलेला शो म्हणजेच ‘बिग बॉस’. यंदा मात्र ‘बिग बॉस’ दोन वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील ‘बिग बॉस १५’ ओटीटी व्हर्जनची सुरवात झाली असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. निर्माता करण जोहार या खास शोचा होस्ट आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची नावं आता अखेर समोर आली आहेत. या यादीत शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी देखील सामील आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. राज कुंद्राच्या अटकेपासूनच शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारली जात होती. यानंतर आता शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात गेली असून तिची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

#BiggBossOTT #ShamitaShetty #RajKundra #ViralVideo #ShilpaShetty #KaranJohar

Amid Raj Kundra Arrest Shilpa Shetty Sister Shamita Shetty Enters Big Boss Ott House

Buy Now on CodeCanyon