Bhandara : नागरिकांनी चक्क बिबट्याच्या जोडीवर केली दगडफेक, Video Viral

Bhandara : जिल्ह्यातील नाकाडोंगरी जंगलात बिबट्यावर काही ग्रामस्थांनी दगडफेक केली. या व्हिडिओमध्ये पोलिस देखील दिसत आहेत. मात्र, त्यांनी दगडफेक केलेली नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर वन्यप्रेमी नदीम खान यांनी तक्रार केली असून भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Bhandara तील तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानगवा यांसारखे अनेक प्राणी आहे. या जंगलात पाच जण फिरण्यासाठी चारचाकीने गेले होते. त्यांना जंगलात दोन बिबटे दिसले. त्याठिकाणी त्यांनी गाडी थांबवून खाली उतरले. तसेच बिबट्याचा व्हिजिओ काढला. यामध्ये त्यापैकी दोन जण बिबट्यावर दगडफेक करत असल्याचे दृश्य देखील कैद झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन्यप्रेमी आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. त्यांनी वन्यजीवांवर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.

#viralvideo ##Bhandara