Surprise Me!

सैनिक कल्याण मंडळाचे संकेतस्थळ त्वरित चालू करा..

2021-08-15 1,604 Dailymotion

भारतीय प्रहार सैनिक संघ या माजी सैनिकांच्या संघटनेतर्फे सैनिक कल्याण मंडळाच्या कार्यालयाबाहेर (पुणे) माजी सैनिकांनी आमरण उपोषण चालू केले आहे. सैनिक कल्याण मंडळाची वेबसाइट गेली तीन ते चार वर्षांपासून बंद आहे ती वेबसाईट त्वरित कार्यान्वित करावी यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजपर्यंत हे संकेतस्थळ (वेबसाईट) कार्यान्वित झालेले नाही. त्यासोबतच माजी सैनिकांच्या असंख्य तक्रारी या आजही सोडविण्यात आलेल्या नाहीत. स्वातंत्र्य दिनानिमित्त संकेतस्थळ सुरू करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. परंतु हे काम अद्याप झाले नसल्याने संघटनेचे पदाधिकारी उपोषणास बसलेले आहेत. जर सदर वेबसाईट लवकर कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्रातील आणि देशातील माजी सैनिक एकत्र येऊन हे आंदोलन व्यापक स्वरूपात करतील. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन त्वरित माजी सैनिकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी सैनिक विनोद सिंग परदेशी आणि सचिव ऍड. संजय शिरसाट यांनी सांगितले.<br />#SoldierWelfareAssociation #OnlineWebsite #SakalMedia

Buy Now on CodeCanyon