बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त व पूजा भटचा सडक 2 चित्रपट हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याची काल घोषणा करण्यात आली. मात्र हा चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर #BoycottSadak2 ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर #BoycottSadak2 लिहून या चित्रपटाला विरोध करत आहे. युजर्स महेश भट व आलियावर निशाणा साधत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलत आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद पुन्हा जोर धरू लागला. सुशांतच्या निधनानंतर फक्त चाहतेच नाही तर कलाकारदेखील इंडस्ट्रीतील राजनीतीबद्दल बोलू लागले. नेपोटिझमबद्दल बऱ्याच कलाकारांनी आपलं मत मांडले. कुणी त्याला विरोध करतेय तर कुणी त्याच्या बाजूने. या वादात स्टार किड्सवरही टीका होऊ लागली. त्यात सुशांतच्या निधनानंतर महेश भट व त्यांचा भाऊ मुकेश भट यांनी अशा काही गोष्टींचा खुलासा केला. त्यामुळे सुशांतचे चाहते नाराज झाले आहेत. याच कारणामुळे सडक 2च्या रिलीजला विरोध करत आहेत आणि लोकांना या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सांगत आहेत.

#lokmat #aliabhatt #BoycottSadak2 #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber