आता छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिका-शोपैकी सर्वात चर्चेतला शो आहे बिग बॉस 14. सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असल्यामुळे या शोकडे अनेकांचं लक्ष आहे. या नव्या कार्यक्रमात कोण कोण आहे, कोण नाही याची उत्सुकता आहेच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बातमी अशी की या सगळ्या लोकांना बिग बॉसच्या घरात जाण्याआधी आणखी एका परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.

बिग बॉसचा सीझन 14 आता येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यानिमित्त 14 स्पर्धक या घरात असणार आहेत. या सर्वच स्पर्धकांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. 11 दिवसांचा क्वारंटाईन पिरिएड असून 20 सप्टेंबरपासून त्यांचा हा क्वारंटाईनचा काळ सुरू होणार आहे. बिग बॉसच्या वर्तुळात चर्चा अशी आहे की मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या एका पंचतारांकित हॉटेलात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थात तिथेही गोपनीयता पाळली जाणार आहे.

#lokmatcnxfilmy #SalmanKhan #Biggboss14 #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber