Surprise Me!

Coronna Updates: सणासुदीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी केंद्राच्या सूचना

2021-08-29 2,144 Dailymotion

कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत... अशी सूचना मोदी सरकारनं राज्य सरकारला पत्राद्वारे केलीय... आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, लोकांची मोठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी... तसेच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात असंही सांगण्यात आलंय... यामुळे हे सण सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी आग्रही असलेल्या राज्यातील भाजप नेत्यांना चपराक बसलीय.. कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती ICMR आणि NCDCने यापूर्वी व्यक्त केलीय.. महाराष्ट्रासह काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत असल्याने, काळजी गरजेची असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटलंय.. दिवाळी आणि छठपूजेसह अनेक मोठे सण येत्या काही दिवसांत साजरे केले जाणार आहेत.. त्यामुळे नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं आव्हान प्रशासनापुढे असणारय.<br />#festivalsincorona #festivals #dahihandiincorona #coronainganeshutsav #indianfestivals

Buy Now on CodeCanyon