सोलापूर ः पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्ती विसर्जनानंतर अनेक वर्षे विरघळत नसल्याने व त्यावरील रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण होऊन जलस्रोताला व जलीय पर्यावरणाला धोका ठरत असल्याने पीओपी मूर्तीला पर्याय म्हणून शाडूच्या गणेशमूर्तीचा पर्याय समोर आला. मात्र शाडूच्या मूर्ती विसर्जनानंतरही तलाव व विहिरीत मातीचा गाळ साचण्याचा धोका समोर येत आहे. त्यामुळे पीओपी व शाडूच्या मूर्तीलाही पर्याय म्हणून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या निर्मितीचा नवा टप्पा म्हणजे "गोमय गणेश मूर्ती' होय. गाईच्या शेणापासून या मूर्ती तयार करण्याचे काम सोलापुरातील शेळगी येथील गणेश गुंडमी हे करीत आहेत. विशेष म्हणजे, विसर्जनानंतर काही तासांत विरघळणारे मूर्तीचे अवशेष जलीय प्राण्यांसाठी खाद्य बनते. तर वनस्पतीसाठी खत म्हणून उपयोगाला येते. यामध्ये बिया टाकल्या तर त्याला खत मिळून नवीन रोप तयार होते. या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत असून, ऍगस्टमध्येच पुणे, बंगळूर व ठाणे आदी शहरांतून या मूर्तींची दोन हजारांपेक्षा अधिक बुकिंग झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या प्रयोगाची दखल घेत मूर्ती मागवून घेतली आहे. <br />(बातमीदार व व्हिडिओ : प्रकाश सनपूरकर)<br />#ganeshutsav #ganesgfestival #ganesgmurti #ecofriendlyganeshmurti #ecofriendlysculptures #ganeshmurtiecofriendly #solappurnews #solapur