Ratnagiri : गारवा देणारा रत्नागिरीतील 'हा' परिसर पर्यटकांना साद घालतोय

Ratnagiri : पर्यावरण संवर्धनासाठी वने विकासाला शासन प्राधान्य देत आहे. याच धर्तीवर पाच वर्षांपुर्वी रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे साडेअकरा हेक्टरवर वन उद्यान विकसित केले आहे. जैवविविधतेचे दर्शन देणार्या या उद्यानात भल्या मोठ्या जंगली वृक्षांबरोबरच विविध प्रकारच्या लुप्त होत चाललेल्या वनौषधीही आहेत. शांत आणि गारवा देणारा हा परिसर पर्यटकांना साद घालतो. येथील जंगली जनावरांबरोबरच अनेक पशूपक्षाचा अधिवासही निसर्ग अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे.

व्हिडीओ - राजेश कळंबटे

#ratnagiri