मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते बाप्पाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला.<br /><br />#dagdushethganpati #ganeshotsav #pune