बुलडाणा - मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर केंद्रातील ब्रम्हपुरी येथे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत सुद्धा ‘रेन रेन कम अगेन’, जॉनी जॉनी एस पापा, अशा इंग्रजी माध्यमच्या कविता विद्यार्थी म्हणत आहेत. या शाळेतील सर्व शिक्षक अभिनव उपक्रम राबवत असून मराठी शाळेत इंग्रजीला प्राधान्य देवून विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयक पायाभूत अभ्यासक्रम पक्का करुन घेत आहेत.