सातारा : जय शिवाजी, जय भवानी, अशा घोषणा, पोवाडा, ढोल-ताशा-हालगी, तुताऱ्या, लेझीम यांचा गजर यासोबतच शिवप्रतापला वंदना म्हणून आकाशातून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी आणि रोमांच उभे करणारे शिवकालीन ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक या वैशिष्ट्यांसह मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.