अकोला : लोकमत समूहातर्फे आयोजित लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या ‘चॅम्पियन’ ट्रॉफीचे शहरातील मुख्याध्यापक तसे क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी अनावरण करण्यात आले. ६ ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये तब्बल १४ खेळांचा समावेश आहे.