कोल्हापूर - कोल्हापुरकरांची खरेदीची हौस पुरवणा-या लोकमत शॉपिंग उत्सवाची सोमवारी (दि.9) हाऊसफुल्ल गर्दीतच सांगता झाली. हा अखेरचा दिवस साधत ग्राहकांनी मनपसंत वस्तूंची खरेदी आणि विविध पदार्थांवर ताव मारत उत्सवाला निरोप दिला. चार दिवस रंगलेला हा उत्सव आनंददायी असल्याबद्दलच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.