अकोला : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांनी अखंड श्रमदान करण्याची सामूहिक गुढी उभारली. शिर्ला येथे सरपंच रिना संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून पाण्यासाठी अभिनव संकल्प करण्यात आला.
