वाशिम - महामार्गालगत असलेल्या शेतधुऱ्यासह सरकारी वृक्षांनाही लाग लावण्याचे प्रकार समोर येत आहेत. उन्हाळी मशागतीच्या कामांचा एक भाग म्हणून शेत धुऱ्यालगतचा काडीकचरा तसेच काटेरी झुडपांचे साम्राज्य नाहिसे केले जाते. <br />काडीकचऱ्याला आग लावून नष्ट केले जाते. हाच प्रकारच महामार्गालगतच्या शेतांमध्येही पाहावयास मिळतो. वाशिम ते मालेगाव, वाशिम ते रिसोड, वाशिम ते कारंजा या मार्गालगतचा शेतधुरा पेटवून दिल्यानंतर यामध्ये सरकारी वृक्षांनाही ‘आच’ लागते. बुंध्याजवळ अर्धवट जळालेले सरकारी वृक्षही यामुळे उन्मळून पडतात.