नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून जुन्या नाशकातील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गा ओळखली जाते. ‘शहंशाहे नासिक’ म्हणून प्रसिध्द असलेले हुसेनी बाबा यांचा वार्षिक यात्रोत्सव (उरूस) येत्या बुधवारपासून (दि.२५) सुरू होत आहे. यानिमित्त जुने नाशिकमधील बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.