नाशिक : यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षाहून अधिक प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.