आता न्यायाधीश 'तृतीयपंथी' इस्लामपूर अदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ पदावर कार्यरत<br /><br />तृतीयपंथी त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच प्रत्यय नुकताच कोलकातामध्ये आला. या ठिकाणी चक्क एक तृतीयपंथी न्यायाधीश झाल्या आहेत. जोयिता मोंडल असे या त्यांचे नाव असून समाजापुढे एक उत्तम आदर्श जोयिता यांनी निर्माण केला आहे. २९ वर्षांच्या जोयिता यांनी जुलै महिन्यात न्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्या सध्या उत्तर दिनाजपूर येथील इस्लामपूर न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ पदावर कार्यरत आहेत.<br />त्यांच्या लिंगाबाबत स्पष्टता नसल्याने त्यांना १० वी मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतरचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र, तृतीयपंथी व्यक्ती न्यायाधीश होण्याची गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अभिमानेची बाब आहे. जोयिता यांनी अतिशय जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठले आहे. उदरनिर्वाहासाठी भीक मागत असतानाच त्यांनी बरेच सामाजिक कामही केले आणि त्याच परिस्थितीत आपले शिक्षणही उत्तम पद्धतीने पूर्ण केले.
