Surprise Me!

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला सध्या सोशल मीडियावर करतायेत हे...

2021-09-13 2,196 Dailymotion

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला सध्या सोशल मीडियावर करतायेत हे...<br /><br />पहा काय आहे नवा ट्रेंड #meToo गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रिंनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विषय किती गंभीर आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक महिला आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहे पण याविषयी ते खुलेपणाने बोलू शकत किंवा न्याय मागू शकत नाही. अशा महिलांनी फक्त सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून ट्विट करावं किंवा फेसबुकवर स्टेटस अपलोड करावं असं आव्हान हॉलिवूड अभिनेत्रींनी केलं आहे. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला आहे. भारतातही ट्विटवर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषदेखील मुक्तपणे हा हॅशटॅग वापरून व्यक्त होत आहेत.

Buy Now on CodeCanyon