Surprise Me!

राज्यातील ऐतिहासिक घटना तृतीयपंथी सरपंच

2021-09-13 1 Dailymotion

राज्यातील ऐतिहासिक घटना तृतीयपंथी सरपंच<br /><br />सध्या तृतीय पंथी वर्गाकडे पाहण्याचे लोकांचे नजरा बदलत आहेत. त्यांच्याकरता सध्या साकारत्मक वातावरण तयार होतंय असं म्हणायला हरकत नाही. याचं सुंदर उदाहरणं महाराष्ट्रतल्या गावात घडत आहे. दुसऱया टप्पयातील ग्रामपंचयात निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे.तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरू आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱयांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथ ज्ञानदेव कांबळे यांना निवडून दिले.दुसऱया टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचयातीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झाले होते. घटनेत दिलेल्या सर्व नागरीकांना सामान हक्कांची ही खऱ्या अर्थाने अंमलबाजवणी होते असं म्हणायला हरकत नाही.

Buy Now on CodeCanyon