वृद्धांचा सांभाळ व्हाव्या या करता सगळ्या सामाजिक थरावर जनजागृती केली जाते. चित्रपट, नाटके, रेडिओ अशा साऱ्याच मध्यमांधून याचा प्रचार प्रसार होत आहे. आरोग्य विज्ञानामुळे वाढलेले आयुर्मान लोकसंख्येत समस्या असू शकते पण कौटुंबिक थरावर अडचण नक्कीच नाही. <br /><br />कलकात्यात राहणारा बिकास नाथ याने आपल्या आईला. सबिता नाथ या 96 वर्षाच्या या महिलेल्या राहत्या घरी कोंडून ठेवलं आणि बायको मुलांसह अंदमान निकोबारला सुट्टीसाठी पळ काढला. शुक्रवारी रात्री झोपलेल्या सबिता नाथ जेंव्हा शनिवारी सकाळी उठल्या तेंव्हा त्यांना जाणवलं कि आपण कोंडल्या गेल्या आहोत. त्यांच्या मदतीस शेजारी धावले व त्यांच्या मुलींना या विषयी सांगण्यात आले आहे. काबाड - कष्ट करून वाढवलेला आपला पोटचा गोळा असं वागेल याची कधी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांना याचा मानसिक त्रास झाला आहे. या विषयांची माहिती त्यांच्या मुलींनी पोलिसांना दिली. सध्या त्यांच्या मुलाशी संपर्क करण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
