एकीकडे 'बेटी बचाव, बेटी पढाव' सारख्या मोहीम देशातील स्रियांना सामान संधी व त्यांच्या प्रती आदरयुक्त भारत निर्माण करत आहे. तर दुसरीकडे देशाचं नावं सातासमुद्रा पार नेहणाऱ्या खेळाडूंशी वाईट वर्तणूक केल्याचे समोर येत आहे. भारताची बॅडमिंटन क्वीन पी व्ही सिंधू हिच्याशी इंडिगोच्या विमानातील ग्राउंड स्टाफने असभ्य आणि उद्दाम वर्तन केल्याचं समोर आलंय. हैदराबाद-मुंबई विमानात आपल्याला वाईट वागणूक मिळाल्याबद्दल सिंधूने ट्विटरवरून नाराजी आणि राग व्यक्त केलाय.<br /><br />ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू एका कार्यक्रमासाठी सकाळी इंडिगोच्या विमानानं मुंबईत पोहोचली. या प्रवासादरम्यान अजितेश नावाचा कर्मचारी आपल्याशी उर्मट भाषेत बोलल्याचं ट्विट तिनं केलं आहे. इतकंच नव्हे तर, प्रवाशांशी नम्रपणे वागण्याचा सल्ला देणाऱ्या एअर हॉस्टेस अशिमा हिलाही त्यानं उडवून लावल्याचं सिंधूनं नमूद केलंय. अशा कर्मचाऱ्यांमुळे इंडिगोची बदनामी होत असल्याचंही तिनं कंपनीच्या निदर्शनास आणून दिलं.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews