Surprise Me!

दिग्दर्शिका Kalpana Lajmi यांच्या कॅन्सरच्या लढतीत मदतगार ठरतायेत 'हे' साथीदार

2021-09-13 2 Dailymotion

एक पल’, ‘रुदाली’, ‘चिंगारी’, ‘दमन’ या स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी या कॅन्सरशी झुंज देत आहेत. किडनीचा कॅन्सर झालेल्या कल्पना यांची तब्येत काल पहाटे अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना पुढचे २४ ते ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.६१ वर्षीय कल्पना यांच्यावर आठवड्यातून चारवेळा डायलिसिस करण्यात येते. त्यांची एक किडनी काढण्यात आली असून त्यांच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांचा खर्चही बॉलिवूड सेलिब्रिटी उचलत असल्याचे कळते.या खर्चाची जबाबदारी ‘इंडियन फिल्म्स अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’, आमिर खान आणि रोहित शेट्टी यांनी उचलली आहे. तसेच, आसाम विद्यार्थी संघटनेच्या सर्व नेत्यांनी शनिवारी लाजमी यांची भेट घेऊन त्यांना उपचारांसाठी आर्थिक मदत केली<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon