Surprise Me!

पश्चिम रेल्वे वर अपघातात दुरुस्तीचे काम चालू असताना अपघात , 3 महिलांचा मृत्यू

2021-09-13 8 Dailymotion

मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रेल्वे रूळांच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या मालाड आणि कांदिवली या स्थानकांदरम्यान दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रेल्वे रूळांच्या दुरूस्ती आणि देखभालीचे काम सुरू होते. गँगमन्सची एक तुकडी हे काम करत होती. यामध्ये चार महिलांचा समावेश होता. रूळांच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना एकाचवेळी दोन ते तीन ट्रॅकवरून लोकल ट्रेन जात होत्या. या ट्रेन येताना पाहून काम करणाऱ्या महिला काहीशा गोंधळल्या. त्यामुळे नेमकी कोणती ट्रेन कोणत्या ट्रॅकवरून जात आहे, याचा नेमका अंदाज त्यांना आला नाही. या गोंधळामुळे त्या चुकीच्या ट्रॅकवर उभ्या राहिल्या. मात्र, या ट्रॅकवरून बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रेन जात होती. या ट्रेनची धडक महिलांना लागली. त्यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon