Surprise Me!

टीव्ही पाहिल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळय़ा होण्याचा धोका. प्रत्येकाने याबाबत विचार करायला हवा

2021-09-13 40 Dailymotion

एकाच ठिकाणी बसून तासनतास टीव्ही पाहिल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका दुपटीने वाढत असल्याचा इशारा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. जास्त वेळ टीव्ही पाहणे हे आधीपासून हृदय़रोगाशी संबंधित आहे. पण एकाच ठिकाणी बसून टीव्ही पाहिल्याने पाय, हात, ओटीपोटी आणि फुप्फुसांच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे यासंबंधीचा अभ्यास प्रथमच करण्यात आला आहे. या आजाराला शिरा असंबद्धता (वेनस थ्रोमबोलिझम)या नावाने ओळखले जाते. जास्त काळ टीव्ही पाहताना लोक एकाच जागेवर तासन्तास बसून राहतात त्याचबरोबर अल्पोपहारही घेतात असे अमेरिकेतील व्हरमॉँन्ट विद्यापीठाच्या मेरी कुशमन यांनी सांगितले. या अभ्यासात सहभागी झालेल्या 45 ते 64 या वयोगटातील 15,158 लोकांचे संशोधकांनी परीक्षण केले. जे लोक नेहमी टीव्ही पाहतात त्या लोकांमध्ये शिरा असंबद्धता होण्याचा धोका क्वचित टीव्ही पाहणाऱ्यांच्या तुलनेत 1.7 पटीने जास्त असल्याचे अभ्यासात आढळून आले.<br />आपण आपला वेळ कशा प्रकारे सार्थकी लावायाचा याबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा असे कुशमन यांनी सांगितले. टीव्ही पाहताना एकाच ठिकाणी तासन्तास न बसता तुम्ही ट्रेडमिलवर धावण्याचा व्यायाम करू शकता किंवा टीव्ही पाहण्याच्या वेळात 30 मिनिटे कपात करून त्याऐवजी तोच वेळ पायी फेरफटका मारण्यासाठी वापरू शकता, असे कुशमन यांनी सांगितले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon