Surprise Me!

आता नर्गिस फाख्री आणि उदय चोप्रा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? | Bollywood Latest News

2021-09-13 285 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाख्री आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे दोघे आता पुन्हा एकत्र आले असून लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.<br />पुढील वर्षी हे दोघेजण लग्न करतील. सूत्रांच्या माहिती नुसार, लग्न करण्यास उदयने होकार दिला असून आता चोप्रा कुटुंबिय नर्गिसच्या उत्तराची वाट पाहत आहेत. या काळात उदयची भेट घेण्यासाठी ती अनेकदा न्यूयॉर्कहून मुंबईला आल्याचेही कळत आहे. इतकेच नव्हे तर जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्यात काही दिवस ती राहिली असून उदयची आई पॅमेलासोबतही तिने काही काळ घालवला.नर्गिस आणि उदयने त्यांच्या रिलेशनशिप चा कधीच उघडपणे स्वीकार केला नव्हता. पण, सोशल मीडियावर त्यांच्या सिक्रेट डेटचे आणि व्हेकेशनचे फोटो नेहमीच व्हायरल होत होते.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon