आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नावदेखील जोडावे लागणार आहे. हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.गायीच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे बॉक्सर्ससाठी फायदेशीर आहे. बॉक्सर्सनी जगात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या गायी देशी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. या गायी दिवसाला १० लीटर दूध देतील, असेही ते म्हणाले. नीतू , ज्योती गुलिया, साक्षी धंदा , शशी चोपडा,अनुपमा , नेहा यादव यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. या सर्व खेळाडूंच्या घरांचे पत्ते घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या घरी गायी पोहोचवल्या जातील, असे धनकर यांनी सांगितले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews