Surprise Me!

डायनासोरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला तयार राहा. तीच जादू करेल पुन्हा मंत्रमुग्ध.

2021-09-13 0 Dailymotion

‘ज्युरॅसिक पार्क’ या स्टिव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित चित्रपटाने 1993 साली लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. हा अमेरिकन सायन्स फिक्शन प्रकारातला चित्रपट होता. ‘ज्युरॅसिक पार्क’ सीरिजमधील चौथा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड : फॉलन किंग्डम’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच त्याचे टीझर प्रदर्शित झाले आहे.युनिव्हर्सल पिक्चर्स इंडिया’च्या युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. ‘पळायला तयार राहा..’ अशी टॅगलाइन या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. १५ सेकंदांच्या या टीझरमध्ये विशालकाय डायनासोर आणि त्यांनी केलेला विध्वंस याची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये क्रिस प्रॅट मुख्य भूमिकेत आहे. तर जेफ गोल्डब्लम, ब्राइस डलास हॉवर्ड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon