बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी रेडिओ शोमध्ये दारुचं व्यसन आणि व्यसनमुक्त होण्याच्या विषयांवर बेधडक वक्तव्य केले. त्यांनी या शोमध्ये सांगितले की, पूजा जेव्हा लहान होती तेव्हा ती फार लाजाळू होती. एक दिवसं दारु प्यायलानंतर मी तिला उचलून घेतले तेव्हा तिने माझ्याकडे पाहून तोंड वळवले. तो माझ्या आयुष्यातला दारू पिण्याचा शेवटचा दिवस होता. संजय दत्तबद्दलही त्यांनी अनेक खुलासे केले. संजयही दारुच्या आहारी गेला होता. त्याच्या दिवसाची सुरूवात दारूने व्हायची. संजय दारुचा उपयोग माऊथवॉश म्हणून करायचा. एक वेळ अशी होती की संजय झोपून उठला की तो सर्वातआधी अमली पदार्थांचाच विचार करायचा. दारुपेक्षाही अमली पदार्थांपासून मुक्तता मिळवणं संजयसाठी खूप कठीण होतं.<br /><br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
