भारतीय टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' शो ज्या शोवर बेतलेला आहे तो शो मध्ये 'बिग ब्रदर'. यूकेचा टीव्ही शो 'बिग ब्रदर'च्या आगामी सीजनमधील घराचे फोटोज समोर आले आहेत. पुढील वर्षी सुरु होणाऱ्या या शोमध्ये घरात फक्त फीमेल सेलिब्रिटीच राहाणार असल्याची चर्चा आहे. वास्तविक मेल कंटेस्टंट्सची नंतर एंट्री होणार आहे
चॅनल 5 वर 'बिग ब्रदर' शो येऊ घातला आहे. यूकेमध्ये 100 वर्षांपूर्वी महिलांना मतांचा अधिकार मिळाला होता. ही आठवण ताजी करण्यासाठी आणि एक प्रकारे महिलांना अभिवादन करण्यासाठी चॅनल 5 शोच्या सुरुवातीला फक्त महिले सेलिब्रिटीजना या शोमध्ये पार्टिसिपेट करणार आहे.
- यूकेमधील टीव्ही शो 'बिग ब्रदर' हा ऑरवेल यांच्या कादंबरीतील पात्रावरुन प्रेरित आहे.

ब्रिटिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांची 1949 मध्ये प्रकाशित 'नाइन्टीन एटी फोर' या कादंबरीत 'बिग ब्रदर' नावाचे एक पात्र होते. त्याच्या भागात राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बिग ब्रदरची नजर असायची.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews