Surprise Me!

सामाजिक सभागृहात थाटली पोलीस चौकी! त्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची कर्तव्याला दांडी

2021-09-13 129 Dailymotion

वाशिम : जिल्ह्यातील कीन्हीराजा येथे चक्क सामाजिक सभागृहात पोलिस चौकी थाटली असून गैरसोयींमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परिणामी दैनंदिन कामकाजही प्रभावित होत आहे. <br />४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी कीन्हीराजा येथे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत सुरू झालेली पोलीस चौकी मध्यंतरी सामाजिक सभागृहात हलविण्यात आली. त्याठिकाणी १० बाय १५ च्या एका खोलीत पोलिसांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या चौकीअंतर्गत येणा-या ४२ गावांपैकी काही गावे अत्यंत संवेदनशिल असून पोलिस कर्मचा-यांना सदोदित तत्पर राहावे लागते. याशिवाय ही चौकी औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अधुनमधून घडणा-या अपघातांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे किन्हीराजात सुसज्ज पोलीस चौकी असणे नितांत गरजेचे आहे.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा-https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon