पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदीनं आणखी १७ बँकांना ३ हजार कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. नीरव मोदीचा कोट्यवधीचा घोटाळा बाहेर आल्यानं विरोधकही आक्रमक झाले आहेत. विजय माल्या, ललित मोदीनंतर आता नीरव मोदी कोट्यवधींचा चुना लावून फरार झाला आहे. पण, मोदी मात्र गप्प आहेत यावरून सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्याचे नीरव मोदीला अभय तर नाही ना? असा प्रश्न विरोधकांसह देशातील जनताही विचारत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या फरार नीरव मोदीचं नामकरण ‘छोटा मोदी’ केलं आहे. या प्रकरणावर मौन बाळगून असलेले पंतप्रधान मोदी आणि फसवणूक केलेल्या नीरव मोदीवर ‘#छोटा_मोदी’ हा हॅशटॅश वापरून ट्विपल्स टीका करत आहेत. सकाळपासून हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे आणि त्याद्वारे नेटकरी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews