Surprise Me!

जिल्हा परिषदेत पोलिसांची अचानक धाड!

2021-09-13 2 Dailymotion

नाशिक : जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन पोलिस अधिका-यांनी अचानक धाड टाकून अनेक अधिका-यांची चौकशी केली. विशेष म्हणजे या पोलिसांना अधिका-यांपर्यंत पोहचू न देता इतर कर्मचा-यांनी या अधिका-यांच्या हातावर खुलेआम चिरेमिरी ठेवण्याचे धाडस केले आणि या अधिका-यांनी देखील मिळालेले पैसे खिशात ठेवत ‘पुढच्या वेळी प्रकरण दडपले जाणार नाही’ असा दम भरत इतर अधिका-यांच्या दालनांचा शोध सुरू केला. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेत आलेले अभ्यागतही गोंधळलेले दिसले. जिल्हा परिषदेत घुसलेले तडफदार पोलीस अधिकारी हे कुठल्या पोलीस ठाण्याचे अधिकारी नव्हते तर ते होते बहुरुपी. ख-या पोलीस अधिका-यांसारखे वाटणारे हे बहुरूपी पाहताक्षणी कुणालाही ते खरे पोलीस असल्याचे सहज भासावे इतका त्यांचा अभिनय आणि वेशभूषा हुबेहूब होती. एस.एस. बागुल आणि दादा रघुनाथ चव्हाण असे या दोन बहुरुप्यांची नावे असून हे दरवर्षी जिल्हा परिषदेत येऊन आपली कला सादर करीत असतात.

Buy Now on CodeCanyon