पुणे : लोकसभा लढवणार?... ऐका, शरद पवारांचं सूचक उत्तर
शिरूर लोकसभा निवडणूक काही महिन्यांपूर्वी लढण्याची इच्छा व्यक्त केलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इच्छेला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लगाम लावल्याचे दिसून आले आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली.या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सध्या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव खासदार आलेल्या शिरूर मतदारसंघात लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते.त्यावर पवार यांनी बोलताना शिरूरमधून अजित पवार यांनी लढण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे अजून पाच ते सहा दावेदार असल्याचे सांगून या मुद्द्याची हवाच काढून घेतली.

शरद पवार म्हणाले की,माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली, माझी इच्छा नाही पण विचार करू.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण, मोदी त्यांच्यावर जसे संस्कार त्याला सुसंगत बोलले.

- लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची 7 महिने आधी सुटका होईल.

- अण्णा हजारे यांचे उपोषण या विषयावर बोलणं, बातम्या वाचणे, पाहणे, गेली 2 वर्षे सोडून दिलं.

- प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारण एन्ट्रीवर बोलणं पवार यांनी टाळले

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat