Surprise Me!

इंदुरीकर महाराजांमुळे तृप्ती देसाई आणि शिवलीला यांच्यात पडणार वादाची ठिणगी

2021-09-23 2,280 Dailymotion

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला रविवार पासून सुरुवात झाली. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबतच सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाईही सहभागी झाल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी इंदुरीकर महारांजावर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. तृप्ती देसाई आणि शिवलीला यांच्यात रंगलेल्या इंदुरीकर महाराजांवरच्या चर्चेमुळे बिग बॉसच्या घरात पुढे जाऊन या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडेल का, हे पाहावं लागेल.<br /><br />#BiggBossMarathi3 #IndurikarMaharaj #TruptiDesai #ShivleelaPatil

Buy Now on CodeCanyon