Surprise Me!

यांना १०० कोटींच्या आकड्याचा मोह; किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर साधला निशाणा

2021-09-28 170 Dailymotion

किरीट सोमय्या यांनी नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याआधी देखील त्यांनी अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. त्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.<br /><br />#KiritSomaiya #ThackerayGovernment #SharadPawar #UddhavThackeray

Buy Now on CodeCanyon