Surprise Me!

Aurangabad: वाळूज परिसरातील मंदिरांचे दार उघडले, भाविकांमध्ये आनंद

2021-10-07 1,040 Dailymotion

#aurangabad #waluj #aurangabadtemplesopen #aurangabadnews #walujnews #reopeningtemples<br />वाळूज (जि.औरंगाबाद) : संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडल्याने नाराजी होती. मात्र नवरात्र उत्सवानिमित्त राज्यातील सर्व मंदिराचे दार गुरुवारी (ता.7) रोजी उघडल्याने भाविकांमध्ये विशेषत: महिलांवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणच्या महिलांनी<br />मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेत कोरोनाचे संकट टळो, अशी मनोभावे प्रार्थना केली. यात प्रामुख्याने पंढरपूर येथील माँ वैष्णौदेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, तुळजामाता मंदिर, रांजणगाव (शेणपुंजी) येथील लक्ष्मी माता मंदिराचा समावेश आहे. (व्हिडिओ - रामराव भराड)

Buy Now on CodeCanyon