#latur #marathwada #aurangabad #heavyrainfall #rainfall<br />मदनसुरी (जि. लातूर)- मदनसुरी (ता. निलंगा) परिसरात दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी-नाले यांना पुर आलाय. या पावसामुळे मदनसुरी ओढ्याला ही मोठा पुर आला होता. हा ओढा ओलांडत असतांना दोन शेतकरी पाण्यात वाहुन गेले. त्यांना पोहता येत असल्याने थोड्या अंतरावर गेल्यावर ते पाण्यातून बाहेर आले.
