Surprise Me!

Aurangabad: वाळूज औद्योगिक परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद

2021-10-11 1,126 Dailymotion

#aurangabad #waluj #maharashtraband #walujmahanagar #mahavikasaaghadi<br />वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची झालेल्या हत्येच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.११) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वाळूज उद्योगनगरीच्या परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला पाठिंबा दिल्याने येथील बजाजनगर कडकडीत बंद होते. तर रांजणगाव (शेणपुंजी), सिडको वाळूज महानगर, पंढरपूर व वाळूज बहुतांश दुकाने सुरू होती. एकंदरीत या बंदला वाळूज परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रथम सकाळी 9 वाजता बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत भाजपा, मोदी व केंद्र सरकारविरुद्ध विरोधात तिव्र निषेध करण्यात आला. (व्हिडिओ - रामराव भराड)

Buy Now on CodeCanyon