Surprise Me!

UdayaRaje Bhosale: मी चालत फिरीन, नाहीतर लोळत फिरीन तुम्हाला त्याचं काय?

2021-10-14 1 Dailymotion

#udayanrajebhosale #killepratapgad #pratapgad #shivsendrasinharajebhosale #satara #mahabaleshwar<br />किल्ले प्रतापगड (महाबळेश्वर) : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आज (गुरुवार) त्यांनी किल्ले प्रतापगडावर (Fort Pratapgad) भवानी मातेचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (MLA Shivendrasinharaje Bhosale) मारलेल्या टोल्यावर पलटवार केला. खासदार उदयनराजेंनी दुचाकीवरून मारलेल्या फेरफटक्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार टीका करत उदयनराजेंवर निशाणा साधला होता. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार उदयनराजे म्हणाले, मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल, तर तुम्हीपण तसं करा, असं त्यांनी म्हटलंय. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Buy Now on CodeCanyon