दादरमधील शिवाजी महाराज पार्कच्या शुशोभिकरणासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. विद्युतरोषणाईवरून मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. या विद्युतरोषणाईसाठी लागणारे दिवे इटलीवरून मागवण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसेने सेनेला विचारला आहे. <br /><br />मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेला खोचक सवाल विचारला आहे. शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.